Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
पिकविलेली रताळी शेतातून बाहेर काढणे झाले मुश्किल
Aapli Baatmi October 21, 2020

वांगी : पिकाच्या काढणीचे व विक्रीचे अचूक नियोजन करीत पिकविलेली रताळी वेळेत शेतातून उकरुन बाहेर काढणे मुश्किल झाल्याने वांगीतील तीन युवा शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नवरात्रीनिमित्त उपवासासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या रताळी पिकाची वेळेत लागण करुन तसेच खते, औषधाची व मशागतीची कामे बिनचूक करीत वांगीतील युवाशेतकरी रमेश एडके व पवन जाधव यांनी प्रत्येकी एक एकर आणि सागर चव्हाण यानी अर्धा एकर रताळी पिकविली आहेत. नवरात्रीचा उपवास सुरु झाला की ती विकायची यानुसार ती अचूक वेळेत काढणीलाही आली. व्यापाऱ्याबरोबर 25 रुपये प्रतिकिलो प्रमाणे दरही ठरला. मागील आठवड्यात या पिकाचा जमिनीवरील पाला काढला.
दोन दिवसात रताळी काढून पाठवायची तोवर मागील आठवड्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडला तिघांचीही रताळी शेती पाण्याने गच्च भरली. दोन दिवसात वाफसा आला की काढू या आशेवर त्यांनी मनाला समजावले. परंतू काल (सोमवारी ) दुपारी अचानकपणे पावसाने झोडपले. या शेतातून पुनश्चः पाणी वाहू लागले आणि या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. शेतात आत जाणेही शक्य नाही. रताळीसाठी एकरी 70 हजार खर्च केलेत. त्यात मशागत व मजूरी घरचीच आहे. यामधून एकरी किमान 15 टन उत्पन्न मिळाले असते. मात्र त्यावर पावसाने पाणी फिरविले आहे. तर शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It was difficult to get the ripe yam out of the field
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023