Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
"एकनाथ खडसे यांनी मला व्हिलन ठरवलं, योग्य वेळी बोलेन; शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा" - फडणवीस
Aapli Baatmi October 21, 2020

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. गेल्या तीन दिवसात फडणवीस यांनी महाराष्ट्रात ८५० किलोमीटरचा प्रवास केला. महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरवडून निघाल्यात, शेत जमिनीवरील मातीही वाहून गेलीये. त्यामुळे शेतकऱ्यांना तिथं नवीन माती आणून टाकावी लागणार आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं “पंचनामे पूर्ण होत आहेत” हे विधान खोडून काढलं, फडणवीस म्हणाले की, आज मुख्यमंत्री म्हणाले ८० ते ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले, पण मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी असं आवाहन फडणवीसांनी केलं.
तोकडी मदत करून भागणार नाही :
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली पाहीजे. सद्य परिस्थितीत तोकडी मदत करून शेतकऱ्यांचं काही होणार नाही. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, शेतकरी सध्या प्रचंड हवालदिल आहेत, शेतकरी आमच्याशी रडत बोलत होते, दिवसाला अनेकदा सातत्याने बँकेतून फोन येतात आणि कर्ज भरण्यास सांगितलं जातंय. दरम्यान आता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावून या भागात बँकांनी कर्जाची वसुली करण्याचा तगादा लावू नये असा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले. एकीकडे कर्जमाफीचा फायदा झालेला नाही आणि दुरीकडे बँक वसुलीचा तगादा लावतायत यावर फडणवीसांनी जोर दिलाय.
महत्त्वाची बातमी : “फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल याची कल्पना केली नव्हती” – मिटकरी
LIVE from Aurangabad.
After extensively travelling in villages and meeting farmers, media interaction at Aurangabad.#Maharashtra#ओला_दुष्काळ https://t.co/gXubo3BOEU— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 21, 2020
शेतकऱ्यांच्या हातात एक नवा पैसा आलेला नाही
यंदा कधी अतिवृष्टी झाली, कधी काय झालं, या संपूर्ण कालावधीत शेतकऱ्यांच्या हातात नवा पैसा आलेला नाही. मागच्या काळात आम्हाला तात्काळ पैसे मिळत होते आता कोणतेही पैसे वर्षभरात मिळालेलं नाही असं शेतकरी म्हणतायत हेही फडणवीसांनी बोलून दाखवलं. .
आता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा :
मागच्या काळात स्वतः मुख्यमंत्र्यांनी २५ हजारांच्या मदतीबाबतची मागणी केलेली. आता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा. मागील पावसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजेत असा तगादा आम्ही लावलाय. मात्र तेही पैसे सरकारने दिलेले नाही. आता सरकारने टाळाटाळ न करता शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे असं फडणवीस म्हणाले.
राज्याला प्रोसेस पूर्ण करावी लागेल
या सरकारकडून शेतरकऱ्यांच्या मदतीसाठी विविध कारणे दिली जात आहेत. GST बाबतचे सर्व पैसे केंद्राकडून दिले जाणार आहेत. केंद्र कर्ज काढून पैसे देतंय. मात्र पावसाने केलेल्या नुकसानानंतर केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारला मेमोरँडम तयार करावा लागेल. मग तो केंद्राला पाठवला जायला हवा, त्यानंतर केंद्राची टीम येऊन पडताळणी करेल आणि त्यानंतर केंद्राकडून निधीस मान्यता देण्यात येते. केंद्र मदत करेल पण राज्याला प्रोसेस पूर्ण करावी लागेल असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडलं.
केंद्राकडून अन्याय हा कांगावा
राज्य सरकारकडून केंद्राकडून राज्यावर अन्याय होतोय हा कांगावा आहे, असंही फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी UPA काळात केंद्राकडून महाराष्ट्राला किती पैसे आलेत आणि त्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राने केंद्राकडे किती पैसे मागीतले आणि किती पैसे आलेत याचा हिशोब वाचून दाखवला. मोदी सरकारच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला तिप्पट पैसे मिळाले आहेत हे फडणवीसांनी बोलून दाखवलं .
महत्त्वाची बातमी : नाथाभाऊंच्या सोडचिठ्ठीनंतर मुंबई भाजपचा बडा नेता पक्ष सोडणार ?
खडसेंनी मला व्हिलन केलं
एकनाथ खडसे यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिलाय. येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान फडणवीसांमुळे मी राजीनामा देत असल्याचं खडसे म्हणाले. यावर फडणवीसांनी उत्तर दिलं. नाथाभाऊंचा राजीनामा अत्यंत दुर्दैवी असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यांच्या मनातील माझ्याबद्दलच्या अडचणी त्यांनी वरिष्ठाना तक्रार करायला हवी होती. एकनाथ खडसे अर्धसत्य सागंत आहेत. मला आता याविषयावर बोलायचं नाही. अशा परिस्थितीत कुणालातरी व्हिलन ठरवायला लागतं. एकनाथ खडसे यांनी मला व्हिलन ठरवलं आहे. त्यामुळे यावर मला काही बोलायचं नाही. मी खडसेंवर योग्य वेळी बोलेन, भाजप हा फार मोठा पक्ष आहे, कुणाच्या येण्याने पक्ष मोठा होत नाही किंवा कुणाच्या जाण्याने पक्ष लहान होत नसतो असं फडणवीस म्हणाले.
devendra fadanavis says eknath khadase made me villain said government should give give relief to farmers
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023