Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
हिंगोली : मदतीसाठी सरकारला भाग पाडू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Aapli Baatmi October 21, 2020

जवळा बाजार (जिल्हा हिंगोली) : यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे योग्य पध्दतीने पंचनामे करुन त्याचा अहवाल तातडीने पाठवावा सरकारला मदतीसाठी भाग पाडू असे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जवळा बाजार येथे शेतकऱ्यांना बुधवार (ता. २१ ) दिले.
जवळा बाजार येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी श्री. फडणवीस येथे आले होते. यावेळी माजीमंत्री पंकजा मुंडे, निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते आदींची उपस्थिती होती. यावेळी श्री फडणवीस यांनी येथील शेतकरी प्रभाकर नागरे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली.
हेही वाचा – हिंगोली : झिरो पेंडसी अँड डेली डिस्पोजल अभियानात सामान्य प्रशासन विभाग अव्वल
हेक्टरी पंचवीस हजार तर फळबागेसाठी दिड लाख रुपये
शेतकरी श्री. नागरे यांनी त्यांना यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. पिकासाठी केलेला खर्च देखील निघाला नसल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. फडणवीस म्हणाले. माझ्या सरकारच्या काळात पुर परिस्थिती व अतिवृष्टीने नुकसान झाल्यावर हेच उध्दव ठाकरे व अजित पवार शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार तर फळबागेसाठी दिड लाख रुपये सरकारने देण्याची मागणी केली होती. आता त्यांचे सरकार आहे त्यांनी किमान आमच्याकडे केलेली मागणी पुर्ण करावी असे ते म्हणाले.
शेतात जाऊन पिकांची पाहणी केली
तत्कालीन सरकारने दहा हजार कोटी शेतकऱ्यांला दिल्याची आठवण करून या सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी आणि ती देण्यास भाग पाडू असे ते म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री पंकजा मुंडे, आमदार संभाजी पाटील निलगेकर यांनी वसमत तालुक्यातील आडगाव (रंजेबुवा) येथे देखील शेतात जाऊन पिकांची पाहणी केली.
येथे क्लिक करा – हिंगोलीत नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना फौजदारपदी पदोन्नती
यांची होती उपस्थिती
यावेळी हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर तसेच मिलिंद यंबल, सुरजित ठाकूर, सतीश सोमाणी, रावसाहेब अंभोरे, मुंजाजी ढोबळे, संजय नागरे, नागनाथ राखे, गेंदूअप्पा विभूते, गजानन नागरे, एकनाथ नागरे व शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर श्री फडणवीस हे औंढा तालुक्यातील माथा येथे मार्गस्थ झाले.
संपादन – प्रल्हाद कांबळे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023