Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
प्रेमप्रकरणात अडसर ठरणाऱ्या मित्राचा धारदार शस्त्राने निर्घृण खून...वाळवा तालुक्यात घडला प्रकार...खुनानंतर आरोपी पोलिस ठाण्यात हजर
Aapli Baatmi October 21, 2020

इस्लामपूर (जि. सांगली)- एकाच मुलीबरोबर दोन मित्रांच्या प्रेम प्रकरणातून जांभूळवाडी (ता. वाळवा) येथील अभिजीत हरी शेलार (वय 22) या महाविद्यालयीन युवकाचा त्याचा मित्र राजेंद्र मारुती बांदल (वय 25) याने धारदार शस्त्राने गळ्याचा कंठ तोडून सपासप 12 वार करत खून केला. बॉम्बे रेयॉन कंपनीच्या पाठीमागे पेठ-जांभूळवाडी रस्त्यावर आज दुपारी तीनच्या सुमारास हा खुन झाला. या घटनेने पेठ व जांभूळवाडी परिसरात एकच खळबळ माजली. संशयित राजेंद्र बांदल हा खून केल्यानंतर स्वतःहुन थेट इस्लामपूर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने खुनाची कबुली दिली आहे. या बाबतची फिर्याद मृत अभिजीतची आई सुवर्णा हरी शेलार यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत अभिजीत व राजेंद्र हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघेही अविवाहीत आहेत. संशयित राजेंद्र बांदल याचे गावातीलच एका मुलीबरोबर अलिकडेच प्रेमसंबंध जुळले होते. यापुर्वी त्याच मुलीबरोबर मृत अभिजीत याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे राजेंद्र बांदल हा अभिजीतला तु आमच्या प्रेमाच्या मध्ये येऊ नकोस, मला अडथळा आणू नकोस असे म्हणून अभिजीतला सांगत होता. मात्र अभिजीत आपल्या प्रेमात अडथळा असल्याने त्याला आज बॉम्बे रेयॉन कंपनीच्या मागे गाठून राजेंद्रने त्याचा खून केला.
अभिजीत हा मुळचा पेठेचा असून त्याचे मामा जांभूळवाडीत आहेत. त्यामुळे तो लहानपणापासून मामाकडेच असायचा. त्या दरम्यान राजेंद्र व त्याची बऱ्याच दिवसापासून मैत्री होती. मात्र या मैत्रीत प्रेमसंबंधाचा अडसर झाल्याने त्याचा काटा आज राजेंद्रने काढला. मृत अभिजीतचा गळा धारदार शस्त्राने तोडून त्याच्या डोक्यात, पोटात, अंगावर एकुण 12 सपासप वार करण्यात आले आहेत. खुनानंतर संशयित राजेंद्र हा इस्लामपूर पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री उशिरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. खुनाची माहिती कळताच पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The brutal murder of a friend who was an obstacle in a love affair with a sharp weapon
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023