Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
कोल्हापूर- कुशिरेतील वृद्धेची बोरमाळ पळविली
Aapli Baatmi October 21, 2020

कोडोली : कुशिरे (ता. पन्हाळा) येथे जोतिबा देवाला दानधर्म करायचे असे सांगून वृद्धेसह दोघांना फसवून 22 हजाराचे दागिने घेऊन मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पोबारा केला. याबाबत कोडोली पोलिसांत गुन्हा नोंद असून फिर्याद श्रीमती विमल मच्छिंद्र गडकरी (वय 60, कुशिरे) यांनी दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विमल व त्यांचा मुलगा यांचे कुशिरे (ता. पन्हाळा) येथे जोतिबाकडे जाणाऱ्या रोडलगत चहाटपरी आहे. आज दुपारी 12.45 वाजता 25 ते 30 वयोगटातील दोघे मोटारसायकलवरून चहाटपरीमध्ये आले. त्यांनी त्यांच्याकडे काळा चहा घेतला. चहा पिल्यानंतर एक जण वृद्धेला म्हणाला, “”आम्हाला जोतिबाचे दर्शन घेण्यास जायचे होते; परंतु सोडत नाहीत. आम्हाला दानधर्म करावयाचा आहे, असे म्हणून 1000 रुपये टेबलवर ठेवून वृद्धेला त्यावर काहीतरी जिन्नस ठेवण्यास सांगितले. वृद्धेने 22 हजारांची गळ्यातील बोरमाळ ठेवताच चोरटे पैसे व बोरमाळ घेऊन पसार झाले. पुढील तपास सहाय्यक फौजदारी नरेंद्र पाटील पाटील करत आहेत.
हे पण वाचा – भाजप राज्यातील सत्ता पुन्हा काबीज करेल
संपादन – धनाजी सुर्वे
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold theft in kolhapur
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023