Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Good News ; महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मंजूर
Aapli Baatmi October 21, 2020

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी पाणीपुरवठा व प्राथमिक शिक्षण मंडळाकडील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन निश्चिती करण्यास राज्यशासनानेही मंजूरी दिली आहे. 1 जानेवारी 2020 पासून या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याचा फायदा महापालिकेच्या चार हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा,अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. महापालिका कर्मचारी संघानेही यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार महानगरपालिका सभागृहाची मान्यता झाली होती. या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविला होता. त्यानुसार या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे.
हे पण वाचा – भाजप राज्यातील सत्ता पुन्हा काबीज करेल
या कामासाठी कर्मचारी संघाने शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला असून, महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी व विशेषतः राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.असे महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
हे पण वाचा – खडसे यांचे आता उतार वयातील राजकारण, त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही
संपादन – धनाजी सुर्वे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023