Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
राज्य मार्गावर कमी उंचीचे पूल ः मिरज पूर्व भागात संताप
Aapli Baatmi October 22, 2020

सांगली ः मिरज पूर्व भागातून गेलेल्या दिघंची ते हेरवाड या नव्या राज्य मार्गावरील मोठ्या ओढ्यांवर कमी उंचीचे पूल बांधले जात असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रमुख राज्य मार्गावर उंचीचे बांधावेत, ओढ्याच्या दोन टोकांशी समांतर पूल असले पाहिजेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. त्याबाबत कॉंग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
त्यासाठी या विभागाने या “हायब्रीड’ योजनेच्या निधीशिवाय स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्याकडेही मागणी करण्यात आली आहे. त्यावर लवकर निर्णय झाल्यास कमी उंचीच्या पुलांवर नाहक खर्च होणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
या राज्य मार्गावर सलगरे, बेळंकी, शिपूर, पायाप्पाचीवाडी, एरंडोली, मल्लेवाडी, टाकळी येथे मोठे पूल आहेत. आढओढ्यावरील पूल सर्वात धोकादायक आणि मोठा आहे. या सर्व ठिकाणी ओढ्याच्या दोन्ही टोकांना समांतर पूल बांधले तरच पावसाळ्यात विनाअडथळा वाहतूक सुरु राहू शकणार आहे. याबाबत एरंडोली, मल्लेवाडी ग्रामपंचायतीसह मिरज पूर्व भागातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला आहे. त्याबाबत सकारात्मक धोरण ठरवावे आणि या राज्य मार्गाला पूरमुक्त ठेवण्यासाठी उंच पूल बांधावेत, अशी मागणी केली आहे.
भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य रविकांत साळुंखे म्हणाले, “”सलगरेपासून मिरजेपर्यंत या रस्त्यावरील ओढ्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. रस्ता दोन दिवस बंद होता. नवीन पूल केल्यानंतर हीच परिस्थिती राहणार असेल तर उपयोग काय? छोटे पूल न करता एकदात उंचीचे पूल बांधावेत.” कॉंग्रेसतर्फे धनराज सातपुते, अमोल पाटील, सुनिल पाटील, फक्रुद्दीन नांद्रेकर, सुनिल गुळवणे, स्वराज्य पाटील यांनी निवेदन दिले आहे.
महिलेचा बळी गेला
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने ओढ्याला प्रचंड पाणी आले आहे. कमी उंचीचा पूल असल्याने मल्लेवाडी येथे एक महिला वाहून गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. दोघांना वाचवण्यात यश आले. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते बंद होतात. यावर पुन्हा कमी उंचीचे पूल बांधणे काय कामाचे, असा सवाल करण्यात आला आहे.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023