Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
सोलापूरच्या ग्रामीण भागात 177 नवे कोरोनाबाधित रुग्ण
Aapli Baatmi October 22, 2020

सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 177 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 641 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 464 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 177 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज 237 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. कोरोनामुळे आज 10 जणांचा जीव गेला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 425 एवढी झाली आहे. कोरोनामुळे 862 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये अद्यापही वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजार 112 एवढी आहे. 25 हजार 451 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. मानेगाव (ता. माढा) येथील 75 वर्षाचे पुरुष, गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथील 70 वर्षाची महिला, टेंभुर्णी (ता. माढा) येथील 60 वर्षाचे पुरुष, गुळपोळी (ता. बार्शी) येथील 55 वर्षाचे पुरुष, अरळी (ता. अक्कलकोट) येथील 55 वर्षाची महिला, लिंक रोड पंढरपूर येथील 65 वर्षाची महिला, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, अंकोली (ता. मोहोळ) येथील 59 वर्षाचे पुरुष, आलेगाव (ता. सांगोला) येथील 40 वर्षाची महिला तर नेवरे (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाच्या पुरूषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 177 new coronavirus patients in rural Solapur
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023