Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
उन्हाळी सुट्टीत दहावी- बारावीच्या परीक्षा ! आरोग्य विभागाकडून मागविला अभिप्राय
Aapli Baatmi October 22, 2020

सोलापूर : शाळांना कुलूप असतानाही यंदाचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरु झाल्याचे सरकारने स्पष्ट केले. 2020- 21 हे वर्ष एप्रिलला संपणार असून अद्याप दहावी- बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक तयार झालेले नाही. शालेय शिक्षण विभागाने वार्षिक सुट्ट्यांचे परिपत्रकच यंदा तयार केले नाही. त्यामुळे बोर्डाला वेळापत्रक तयार करता आले नसून कोरोनावरील लस अद्याप प्रतिक्षेत असल्याने यंदाच्या परीक्षा उन्हाळी सुट्टीत घेण्याचे नियोजन बोर्डाकडून सुरु झाल्याचे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला दिवाळी, नाताळासह अन्य वार्षिक सुट्ट्यांचे दोन सत्रात परिपत्रक शासनाकडून काढले जाते. त्यानुसार पुणे बोर्डाकडून दहावी- बारावीच्या परीक्षांचे नियोजन करुन सप्टेंबर तथा ऑक्टोबरच्या पंधरवड्यात वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होते. मात्र, यंदा शाळा बंद असल्याने सुट्ट्यांच्या संदर्भात शासनाकडून कोणतेही परिपत्रक निघाले नाही. आपत्तकालीन परिस्थितीत यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात कधीपासून झाली, याबाबत लेखी काहीच आदेश नाहीत. दरम्यान, कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून संसर्ग पुन्हा वाढू शकतो, अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा कशापध्दतीने घेता येईल, याबाबत संचालकांची पुढील महिन्यात बैठक होईल. या बैठकीत जानेवारी 2021 नंतरच्या कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायची, तर सोशल डिस्टन्सिंगमुळे किती केंद्रे वाढविता येतील, या बाबींवर ठोस चर्चा होणार आहे. मात्र, उन्हाळ्याचा काळ परीक्षेसाठी उत्तम असल्याने या काळात परीक्षा घेण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचेही बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या अभिप्रायानुसार नियोजन
शैक्षणिक वर्षातील वार्षिक सुट्ट्यासंदर्भांतील परिपत्रक मिळालेले नाही. दरवर्षी त्यावरून दहावी- बारावीतील नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन केले जाते. कोरोनामुळे यावर्षी परीक्षांचे नियोजन लांबले असून त्यासंदर्भात लवकरच सर्व संचालकांची बैठक होईल. त्यानंतर राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून, आरोग्य विभागाच्या अभिप्रायानुसार वेळापत्रक निश्चित केले जाईल.
– डॉ. अशोक भोसले, सचिव, पुणे बोर्ड
राज्यातील विद्यार्थ्यांची स्थिती
- दहावीचे विद्यार्थी
- 17.09 लाख
- बारावीतील विद्यार्थी
- 14.96 लाख
- अंदाजित परीक्षा केंद्रे
- 19,000
- कोरोनामुळे एका वर्गातील विद्यार्थी
- 24
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: class X and XII students examination for Summer vacation; The schedule will be fixed according to the opinion of the health department
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023