Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सात्वन करण्यास गेलेल्या दरेकर यांनाही अश्रू अनावर, करगणीत जाधव कुटुंबाला मदत मिळवून देण्याची ग्वाही
Aapli Baatmi October 22, 2020

आटपाडी (सांगली) ः करगणी (ता. आटपाडी) येथील बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शुभम जाधव (वय 20) याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टी पाहणी दौऱ्यातून सवड काढून भेट दिली. त्यांच्याकडे व्यथा मांडताना शुभमच्या माऊलीने हंबरडा फोडला. “माझे लेकरु, माझे पिल्लू मला परत द्या. माझे लेकरु मला पुन्हा हवे आहे. माझा संसार उध्वस्त झाला’ असा हृदय पिळवटून टाकणारा टाहो फोडला. दरेकर यांनाही अश्रू अनावर झाले. त्यांनीही शुभमच्या आई-वडील, बहिणीचे सांत्वन करून आधार देण्याचा प्रयत्न केला.
श्री. दरेकर आटपाडी तालुक्यात नुकसानीच्या पाहणीसाठी आले. दिघंची-विठलापूर आटपाडी येथे पाहणी करून करगणी येथील रामनगरमधील शुभम जाधव याचा पाण्यात पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी दरेकर यांनी भेट दिली. शुभमचे कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरले नसल्याचे समोर आले. दरेकर यांच्यासमोर माऊली, शुभमच्या बहिणीने हंबरडा फोडला.
कुटुंबातील इतर सदस्यांनीही हंबरडा फोडला. व्यथा एकून दरेकरनाही अश्रु अनावर झाले. त्यांनी सरकारी दरबारी व्यथा मांडू. जाधव कुटुंबाला न्याय मिळवून देऊ, असे सांगितले. तेथे उपस्थित तहसिलदारांशी चर्चा केली. हा विषय संवेदनशील आहे. जिल्हाधिका-यांशी बोलू. लवकर मदत मिळवून देऊ. ताई तुमच्या सोबत आहे. काळजी करु नका अशा शब्दात त्यांनी धीर दिला.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darekar also shed tears, testifying to help Jadhav family in Kargani
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023