Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
स्मार्ट सिटी योजनेबाबतच्या तक्रारी मांडा आता ॲपद्वारे
Aapli Baatmi October 22, 2020

बेळगाव : बेळगाव स्मार्ट सिटी विभागाने ‘बेळगाव सिटीझन ॲप’ तयार केले आहे. स्मार्ट सिटी योजनेचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मोबाईल ॲप्लकेशनच्या माध्यमातून स्मार्ट सिटी योजनेबाबतच्या तक्रारी नागरिकांना मांडता येणार आहेत. शिवाय या माध्यमातून दाखल झालेल्या तक्रारी तातडीने सोडविणे स्मार्ट सिटी विभागालाही शक्य होणार आहेत.
हेही वाचा – तरीही ती घाबरली नाही ; नवव्या महिन्यात १२ वाड्यांमध्ये दिली आरोग्य सेवा
स्मार्ट सिटी विभागाच्या मते, हे मोबाईल ॲप बेळगावकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे. महापालिका तसेच विविध शासकीय संस्थांकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती या एकाच ॲपमध्ये मिळणार आहे. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन, महिला साहाय्य आदींशी संबंधित माहिती या ॲपवर उपलब्ध आहे. याशिवाय महत्त्वाच्या घडामोडी, तापमान, पर्जन्यमान आदींची माहितीही मिळणार आहे.
शहरातील बससेवा, कोणती बस नेमकी कोठे आहे, बसचे वेळापत्रक, अग्निशामक वाहने व अन्य तातडीच्या सेवा, कचरा वाहतूक करणारी वाहने याबाबतची नेमकी माहितीही मिळेल. स्मार्ट सिटी योजनेच्या कमांड व कंट्रोल सेंटरमधून शहरातील वाहतूक सिग्नल, सीसीटिव्ही कॅमेरे, घंटागाडी योजना आदींचे नियमन केले जाणार आहे. तसेच नागरी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याच धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेशी संबंधित सर्व माहिती, नागरी सुविधांबाबतची माहिती, कर भरणा, अत्यावश्यक सेवा आदींची माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
जानेवारी २०१६ मध्ये बेळगाव शहराची निवड स्मार्ट सिटी योजनेत झाली. २५ जून २०१६ रोजी स्मार्ट सिटी योजनेतील तीन कामांचा प्रारंभ झाला, पण गेल्या सव्वाचार वर्षात या योजनेच्या अंमलबजावणीवरुन सातत्याने टीका होत आहे. या योजनेतील बहुतेक सर्व कामे एकाचवेळी सुरू केली आहेत. रस्ता कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशा स्थितीत योजनेबाबत तक्रार करण्यासाठी बेळगावकरांना मोबाईल ॲपमुळे व्यासपीठ मिळाले आहे.
हेही वाचा – मच्छीमारांच्या समस्येत पावसाळी वातावरणाची भर –
तक्रारींची संख्या वाढणार
नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले? स्मार्ट सिटी विभागाकडून त्यावर कोणती कार्यवाही केली? हे या ॲिप्लकेशनमध्ये कळणार आहे. स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तब्बल सव्वाचार वर्षांनी हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीची बेळगावातील स्थिती पाहता या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वाधिक तक्रारीच दाखल होण्याची शक्यता आहे.
संपादन – स्नेहल कदम
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023