Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
आरवडे गावात वीज उपकेंद्र सुरु तत्काळ सुरू करा
Aapli Baatmi October 22, 2020

तासगाव : तासगांव तालुक्यातील आरवडे गावात केंद्राची संसद आदर्श गाव संकल्पना खासदार संजय पाटील यांच्यावतीने राबविण्यात आली. त्याअंतर्गत आरवडेत 33/11 के.व्ही. उपकेंद्र मंजूरही झाले. आजअखेर निविदा न काढल्याने हे काम अजून रखडले आहे. रखडलेले काम तातडीने करून आरवडेत वीज उपकेंद्र सुरु करावे, अशी मागणी युवा नेते, एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस राजीव मोरे यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मुंबई येथे केली. त्यावेळी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
आरवडेतील वीज उपकेंद्र होणे महत्वाचे आहे. या भागात ताकारी,पुणदी-विसापूर पाणी योजना कार्यरत आहेत. हातनूर, बोरगाव, शिरगाव शाखे अंतर्गत 40 नवीन रोहित्रे मंजूर आहेत. रोहित्राचे अंदाजपत्रक वरीष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी पाठवलेले आहे. कामे तातडीने पुर्ण झाल्यास शेतीला योग्य दाबाने वीज पुरवठा होणार आहे. रोहित्रे जळण्याच्या घटनाही टळतील. एकूणच वीज पुरवठा सुरळीत व सुरक्षित होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, श्री. राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला उचित कारवाईचे आदेश दिले आहेत. काही दिवसांतच वीज उपकेंद्राच्या निविदा कार्यान्वित केल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023