Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
झोपडपट्टी काढल्यानंतर राहायचे कुठे ?
Aapli Baatmi October 22, 2020

किर्लोस्करवाडी : रामानंदनगर (ता.पलूस) येथे बापूवाडीतील झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी आमिर (भैय्या) पठाण यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. रेल्वेच्या दुपदरीकरणामुळे अतिक्रमण काढण्याची नोटीस पुणे रेल्वे मंडलने पाठवली आहे.
गरीबांचा संसार रस्त्यावर आला आहे. ते 40 वर्षापासून ते रामानंदनगरचे रहिवासी आहेत. मतदान कार्ड आणि शिधापत्रिका त्यांच्याकडे आहेत. ग्रामपंचायत या संकटांत चर्चासुध्दा करायला तयार नाही.
लॉकडाऊनमध्ये सामान्य मजुरांनी कोरोनाशी झुंज द्यावी की प्रशासनाशी असा प्रश्न आहे. झोपडपट्टी काढल्यानंतर ते राहणार कुठे ? त्यांना भाड्याने पण राहायला घर कोणी देत नाही. उदरनिर्वाह भटकंती करून चष्मे विकून होता. नवी पिढी सेंट्रींगवर गवंढ्याच्या हाताखाली कामाला जाऊन उदरनिर्वाह करीत आहे.
आंदोलनकर्ते लक्ष्मण चव्हाण, नूर ईराणी, नेताजी इंगोले, निसार ईराणी, सादक ईराणी, वसंत माळी, विजय माळी, सुनील माळी, मोहन शिंदे, सौ. रेश्मा माने, सौ. सजिला ईराणी यांच्यासह झोपडपट्टीवासीय उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023