Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
अभयारण्य़ाचा परिघ झाला कमी
Aapli Baatmi October 23, 2020

कोल्हापूर ः राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केला आहे. दोन वर्षांपूर्वी अभयारण्याच्या मध्यबिंदूपासून दहा किलोमीटर परिसरातील गावांचा समावेश केला होता; मात्र नव्या अधिसूचनेत हे अंतर कमी करून सहा किलोमीटर परिसरातील कोल्हापूर व सिंधुदुर्गातील एकूण 41 गांवाचा समावेश केला आहे.
अभयारण्यातील जैवविविधता, वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठी अभयारण्याचा विस्तार केला. यात कोल्हापूरातील 26 तर सिंधुदुर्गातील 15 गावांचा समावेश आहे. वन्यजीव जैविविधतेचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने अभयारण्य विस्ताराचा निर्णय घेतला होता. तेव्हा हे अंतर हवाई दहा किलोमीटर होते. त्यावर अनेक गावांनी विस्तारीकरणाला हरकती घेतल्या. हरकती विचारात घेऊन दहा किलोमीटरचे अंतर वन व पर्यावरण मंत्रालयाने रद्द केले. नव्या निर्णयानुसार हे अंतर सहा किलोमीटर परिघाचे केले आहे. या परिघातील गावे संवेदनशील झोन म्हणून घोषित केल्याची अधिसूचना नुकतीचे काढली आहे. विस्तारित क्षेत्राच्या देखरेखीसाठी समिती गठीत केली आहे.
अभयारण्यातील वन्य धन
अभयारण्यात विविध प्रकारच्या वनस्पतींसह सस्तन प्राण्यांच्या 47 प्रजाती, सर्प 59 प्रजाती, उभयचर 20 प्रजाती, फुलपाखरांच्या 60 प्रजाती व विविध प्रकारचे पक्षी याशिवाय गवे, पट्टेरी वाघ, बिबट्या, लांडगे, हत्ती, रानमांजरे, जंगली कुत्रे, शेखरू, रानटी हत्ती आदी वन्यजीव आहेत.
गावे अशी
कोल्हापूर जिल्हा ः गगनबावडा ः बावेली, तळेखुर्द, बोरबेट, सालगाव, गारिवडे.
राधनागरी ः राई कंदलगाव, मानबेट, पडसाळी, दुर्गमानवाड, पिरळ, हेळेवाडी, पणोरी, फराळे, लिंगाचीवाडी, एैनी.
भुदरगड ः फये, अंतुर्ली, हेदवडे, एरंडपे, वासनोली, कोंडोशी, करंबळी, शिवडाव.
सिंधुदुर्ग जिल्हा ः कुडाळ ः दुर्गानगर, यवतेश्वर, जांभूळगाव
कणकवली ः नरडवे, रांजणगाव, नाटळ, कुंभवडे, भिरवंडे, रामेश्वर नगर, हरकुळ खुर्द, गांधीनगर, फोंडा, घोणसरी.
वैभववाडी ः कुर्ली , शिराळे.
विस्तारित गावांसाठी निर्बंध
– नवा उद्योग, चालू प्रदूषणकारी उद्योगांना विस्तारबंदी
– उत्खनन प्रदूषणकारी उद्योग, लाकूड गिरणी, वीट्ट भट्टी, प्लास्टिक व्यवसायावर निर्बंध
– घरबांधणी व दुरुस्तीसाठी जमीन खोदाईस मुभा
निगराणी समिती
जिल्हाधिकारी कोल्हापूर, सदस्य सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी प्रतिनिधी, राज्य शासनाचे वन्यजीव क्षेत्रात काम करणारा एक अशासकीय प्रतिनिधी, प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी, नगर योजनाकार, पाटबंधारे विभाग प्रतिनिधी, राज्य जैव विविधतेचा सदस्य, उपवनसंरक्षक वन्यजीव संरक्षक.
संपादन ः रंगराव हिर्डेकर
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023