Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
नदीत वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला
Aapli Baatmi October 23, 2020

कोल्हापूर – राजाराम बंधाऱ्यावरून वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह आज सापडला. संस्कार राहुल कुरणे (वय 12, रा. पोवार गल्ली, कदमवाडी) असे त्याचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळेलेली माहिती, कदमवाडी येथील संस्कार कुरणे व त्याचा मित्र नजीब ट्रेनर मंगळवारी सकाळी राजाराम बंधाऱ्यावर पोहण्यास गेले होते. येथील पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने प्रवाहात दोघे अडकले. यातील नजीब ट्रेनरला येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या सदस्यांनी बाहेर काढले. मात्र संस्कार वाहून गेला होता. त्याचा परिसरातील नागरिकांनी व अग्निशामक दलाने शोध सुरू केला होता.
हे पण वाचा – …तर कोल्हापुरी हिसका दाखवावा लागेल
दरम्यान, आज शिये पुलाजवळील जॅकवेलजवळ संस्कारचा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसून आला. अग्निशामक दलाचे जवान मनीष रणभिसे, सुनील वाईंगडे, मधुकर जाधव, प्रमोद मोळे, अभय कोळी, सुनील यादव यांनी मृतदेह पाण्यातून काढून शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी याची माहिती पालकांना दिली. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. संस्कारच्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.24) आहे.
संपादन – धनाजी सुर्वे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023