Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो : ऍड. आंबेडकरांवर टिका करताना आठवलेंचाही सुटला तोल
Aapli Baatmi October 23, 2020

पंढरपूर (जि. सोलापूर ) : एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो, अशी टिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीच नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज पंढरपूर येथे केली.
मंत्री रामदास आठवले आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला. आठवलेंच्या या वक्तव्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. मंत्री आठवले म्हणाले, राज्यात भाजप-आरपीआय युती भक्कम आहे. आम्हाल राज ठाकरेंची गरज नाही. उलट ते आमच्या बरोबर आल्यास आमचे मतदान कमी होईल. कंगनाला एक कलाकार म्हणून आमचा पाठिंबा होता. तिच्या देशविरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचे त्यांनी सांगितले. बिहार निवडणुकीत भाजप आणि जेडीयुची सत्ता येणार आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले तरी त्यांच्या सोबत कुणी जाणार नाही. आणि जरी गेले तर त्यांना काही मिळणार नाही. भाजपमध्ये देखील इनकमिंग सुरु होईल, असा आशावाद आठवले यांनी व्यक्त केला. दरम्यान, मंत्री आठवले यांनी आज अतिवृष्टी झालेल्या भंडीशेगाव येथे जावून नुकसान झालेल्या पिकांची आणि फळबांगाची पाहणी केली. यावेळी राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, आप्पासाहेब जाधव, किर्तीपाल सर्वगोड, संतोष पवार, जितेंद्र बनसोडे आदी उपस्थित होते.
संपादन : अरविंद मोटे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023