Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
अतिवृष्टीचा डाळिंबाला अडीचशे कोटीचा दणका
Aapli Baatmi October 23, 2020

आटपाडी (सांगली) : आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे 2800 हेक्टर क्षेत्र आणि हेक्टरी दोन लाख रुपये प्रमाणे 60 कोटी नुकसान झाल्याचा प्राथमिक नजरवारी अंदाज कृषी विभागाने प्रशासनाकडे सादर केला आहे. तर डाळींब तज्ञानुसार हेक्टरी पाच ते सात लाख रुपये प्रमाणे चार हजार हेक्टर क्षेत्राचे तब्बल अडीचशे कोटी रुपये नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली आहे. गतीने पंचनामे सुरू असून पाऊस आणि चिखलामुळे पंचनाम्याला ब्रेक लागत आहे.
तालुक्यात डाळींबाचे 12 ते 15 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील मृग हंगामात दहा हजार हेक्टर क्षेत्राचा बहार धरला असून तेवढ्या क्षेत्राचा विमा भरला आहे. एका हेक्टरमध्ये 10 बाय 12 फूट अंतरावर लागवड केल्यास किमान हजार झाडे बसतात. हजार ते बाराशे झाडातून प्रत्येक झाडामागे सरासरी पंधरा किलो प्रमाणे 15 ते 18 टन उत्पादन निघते. सरासरी किमान पन्नास रुपये प्रति किलो भाव मिळाला तर सात ते नऊ लाख रुपये उत्पन्न हेक्टरी निघते. यासाठी हेक्टरी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. हंगाम धरल्यापासून संततधार सुरू असून चार वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला. अजूनही अनेक बागात पाणी साचले आहे. तर बहुतांश बागा फळकुज, कुजवा, पाकळी करपा या रोगाने बागा वाया गेल्या. सल्फर आणि कॉपरचे डस्टिंग बागात सतत केले.
याचा दुष्परिणाम होऊन झाडांची पानगळ आणि फुलगळ सुरू झाली. कृषी विभागाने शेतात जाऊन पंचनामे सुरू केलेत. त्यांनी काढलेल्या प्राथमिक अंदाज वारी नुसार आठावीशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून तशी माहिती वरिष्ठांकडे कळवली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार हेक्टरी दोन लाख रुपये प्रमाणे साठ कोटी नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मांडला आहे.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excessive rains hit pomegranates to the tune of Rs 250 crore
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023