Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पोलिसांना मिळणार आता २० लाखांचा विमा
Aapli Baatmi October 23, 2020

बेळगाव : पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सेवेवर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये विम्याच्या स्वरुपात मिळणार आहेत. विमा कंपन्यांकडून २० लाख रुपयांचा विशेष संघ विमा (ग्रुप इन्शुरन्स) मंजूर करून घेण्याचे आदेश पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांनी बजावले आहेत. यासह सेवेवर निधन झालेल्या पोलिसांची माहिती सात दिवसांच्या आत विमा कंपन्यांना न कळविल्यास संबंधित अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार ठरविले जाईल, असेही बजावले आहे.
राज्य पोलिस दलाने ग्रुप इन्शुरन्ससाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीलाच कायम ठेवले आहे. महिनाभरात कंपनीने मृत्यू पावलेल्या पोलिसाच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम अदा करणे आवश्यक आहे. यासह नैसर्गिक आजार, हृदयविकार, आत्महत्या आदी कारणांमुळे मृत्यू झाल्यास ही विमा सुविधा मिळणार नाही. ज्या ठाण्यातील कर्मचाऱ्याचा सेवेवर मृत्यू होईल, त्या ठाण्याचे निरीक्षक, संबंधित विभागाचे उपअधीक्षक यांनी सात दिवसांच्या आत ही माहिती विमा कंपनीला देणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. तसेच कंपनीनेही महिनाभरात मृत पोलिसाच्या कुटुंबाला विमा रक्कम अदा करावी लागेल.
हेही वाचा- बेळगावात पूरग्रस्तांना हक्काचे घर बांधण्यासाठी मिळणार ५ लाख
पोलिसाचा सेवेवर मृत्यू झाल्यास सेवा पुस्तक, ठाणाधिकाऱ्याकडून विमा रक्कम कुणाच्या नावे दिली जावी याबाबतचे पत्र, एनपीएस आदेश पत्र, एफआयआर, शवचिकित्सा अहवाल, सेवारत मृत्यू झाल्याबाबतचे वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातमीचे कात्रण, कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड, बॅंक खाते आदी सर्व माहिती विमा सुविधा घेण्यापूर्वी कुटुंबाला तसेच पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना विमा कंपनीला पुरवावी लागणार आहे.
संपादन – अर्चना बनगे
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023