Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
साखरगडावर यंदा यमाईदेवीच्या पादुकांचे दर्शन
Aapli Baatmi October 23, 2020

गोडोली (सातारा) : किन्हई (ता. कोरेगाव) येथील साखरगडावर साखरगड निवासिनी यमाईदेवीचा शारदीय नवरात्र उत्सव मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत व देवीचे उपासक डॉ. कालिदास अयाचित यांनी सुरू केला आहे.
कोणत्याही भक्ताला मुख्य दरवाजातून आत प्रवेश दिला जात नाही. मात्र, भक्तांची गैरसोय लक्षात घेऊन मुख्य दरवाजाच्या बाहेर पायरीवर देवीच्या पादुका टेबलावर ठेवलेल्या आहेत. तसेच दर्शनासाठी देवीचे छायाचित्र लावले आहे. साडेतीनशे वर्षांत प्रथमच अशा पद्धतीचे दर्शन भाविकांना घ्यावे लागत आहे.
डॉ. अयाचित हे पहाटे पाच वाजता काकड आरती, षोडशोपचार पूजा, सुक्ताने अभिषेक, सप्तपदी पठण करून दिवसाची सुरवात करतात. दुपारी साडेबारा वाजता महानैवेद्य व मंत्रपुष्पांजली होते. त्यानंतर देवीच्या पादुका पालखीत ठेऊन मंदिराच्या परिसरात पालखी प्रदक्षिणा होते.
नवरात्री उत्सवात दररोज धार्मिक विधी पार पाडला जातो. भाविक गडावर येत असले तरी कोविडचे नियम तंतोतंत पाळून प्रवेशव्दाराबाहेरच पादुकांचे दर्शन घेऊन परत फिरतात. तर काहीजण गडाला प्रदक्षिणा घालताना दिसतात. सध्या पाऊस भरपूर झाल्याने शेतात काम करता येत नसल्याने भाविक पहाटेपासूनच गडावर लांबूनच यमाईदेवीचे दर्शन घेऊन परत फिरताना दिसून येतात.
Edited By : Siddharth Latkar
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023