Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
जिल्ह्यात 9 खासगी रूग्णालयांना 'नॉन कोविड' सेवेस परवानगी
Aapli Baatmi October 23, 2020

सांगली : कोरोना रूग्णांची संख्या सद्यस्थितीत कमी होत आहे. रूग्णांवर उपचारासाठी उपलब्ध खाटांची संख्या आवश्यक प्रमाणात शिल्लक राहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील नऊ रूग्णालयांना 26 ऑक्टोबरपासून नॉन कोविड रूग्णालय म्हणून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
सद्यस्थितीत कोविड रूग्णालय म्हणून कार्यरत असलेल्या ज्या रूग्णालयांत कोविड रूग्णांची संख्या अतिशय कमी किंवा शुन्य आहे अशा रूग्णालयांत सद्यस्थितीत नॉन कोविड रूग्णसेवेची आवश्यकता लक्षात घेऊन नॉन कोविड रूग्णसेवा कार्यान्वीत करण्याचा निर्णय घेतला. कोविड रूग्णांची सद्यस्थिती पाहता व कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेमधील रूग्णांची संख्या वाढल्याचे आढळल्यास रूग्णालय पुन:श्च कोविड रूग्णालय म्हणून कार्यान्वीत करण्यात येईल. या अटीस अधिन राहून रूग्णालयांना नॉनकोविड रूग्णालय म्हणून कार्यान्वीत करण्यासाठी परवानगी दिली आहे.
डॉ. शरद घाटगे यांचे घाटगे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (सांगली), डॉ. महेश दुदनकर यांचे दुदनकर हॉस्पिटल (सांगली), डॉ. अनिल मडके यांचे श्वास हॉस्पिटल (सांगली), डॉ. महेश जाधव यांचे अपेक्स हॉस्पिटल (मिरज), डॉ. रविंद वाळवेकर यांचे भगवान महावीर कोविड हॉस्पीटल (सांगली), डॉ. दिपक शिखरे यांचे लाईफकेअर हॉस्पीटल (सांगली), डॉ. चोपडे यांचे दक्षिण भारज जैन समाज हॉस्पीटल (सांगली), डॉ. सचिन सांगरूळकर यांचे साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (इस्लामपूर) व डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी यांचे मयुरेश्वर हॉस्पीटल (जत) या रूग्णालयांचा समावेश आहे.
खासगी कोविड सेंटर बंद…
कोविड हेल्थ सेंटर (खासगी) (कवठेमहांकाळ) व श्री. सिध्दीविनायक कोविड केअर सेंटर (विटा) या रूग्णालयाच्या संचालकांनी त्यांची रूग्णालये सद्यस्थितीत रूग्णांअभावी सुरू ठेवणे अशक्य असल्याबाबत कळवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी आढावा बैठकीत ही रुग्णालये बंद करण्यास परवानगी दिली.
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023