Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
नितीन गडकरींचा थेट फार्मा कंपनीच्या मालकाला फोन, नागपुरात एका झटक्यात 10 हजार इंजेक्शन
Aapli Baatmi April 11, 2021
नागपूर : राज्यात कोरोना महामारीमुळे सगळेच हैराण आहेत. कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे राज्यातील ठिकठिकाणी आरोग्ययंत्रणेवर ताण पडतो आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस, तसेच औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागपुरात तर ही परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आहे. त्यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा पुन्हा उपलब्ध करुन देण्यासाठी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली आहे. (Nagpur Nitin Gadkari demands Remdesivir injection to Sun Farma company owner to treat Corona patient)
लवकरच 10 हजार रेमेडिसिव्हीरची इंजेक्शन्स उपलब्ध होणार
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथे सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो आहे. तसेच औषधांचाही तुटवडा निर्माण होतो आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी हालचाली केल्या आहेत. त्यांनी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली आहे. तसेच त्यांना रेमेडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावते अशी मागणीसुद्धा सन फार्माच्या मालकाकडे केली. या चर्चेनंतर नागपुरात लवकरच एकूण 10 हजार रेमेडिसिव्हीरची इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहे. आजच्या आज (10 एप्रिल) तत्काळ 5 हजार इंजेक्शन सन फार्माकडून दिले जाणार आहेत. तर उर्वरित 5 हजार इंजेक्शन्स आगामी दोन दिवसांत उपलब्ध करुन दिले जातील.
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023