Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
बेळगावात लसीचा पुरेसा साठा; नागरिकांकडून प्रतिसाद, आरोग्य विभागाची माहिती
Aapli Baatmi April 14, 2021

बेळगाव : कोरोना लसीकरणाला सुरवातीला प्रतिसाद मिळत नव्हता, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात रोज सुमारे पाच हजार जणांनी कोरोनाची लस घेतल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. सध्या जिल्ह्यात पुरेशी कोरोना लस आहे, त्यामुळे लसीकरणावर परिणाम होणार नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात बेळगाव कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे तीन दिवस कोरोना लसीकरण मोहीम थांबली होती. पण, यापुढे असे होणार नसल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.
बेळगावात सध्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरीकांना कोरोनाची लस दिली जात आहे. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. जास्तीत नागरीकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा यासाठी आरोग्य विभागाकडून जागृती केली जात आहे. घरोघरी जावून ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरीकांना लस घेण्याची सक्ती केली जात आहे. ७ एप्रिलपर्यंत संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात कोरोना लस घेतलेल्यांची संख्या २६ हजार ६५७ इतकीच होती. पण, त्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
मार्च महिन्यांत ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे व गंभीर आजाराने त्रस्त असलेले नागरिक, ज्येष्ठ नागरिक याना कोरोना लस देण्यात आली. त्याआधी फ्रंटलाईन वर्कर्सना व सर्वात आधी कोरोना वॉरीयर्सना लस देण्यात आली. पण पहिल्या तीन टप्प्यात कोरोना लसीकरणाला प्रतिसादच मिळाला नव्हता. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होती त्यामुळे लस नको अशी भावना जनमानसात निर्माण झाली होती. पण मार्च महिन्यापासून कोरोनाबाधीतांची संख्या वाढू लागली आहे. दुसऱ्यांदा लॉक डाऊन जाहीर करण्याची स्थिती बेळगावसह राज्यभरात निर्माण झाली आहे. त्यामुळे लसीकरणाचे वेग वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहेच. शिवाय लस घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
हेही वाचा – नियंत्रण कक्षातून राहणार नजर; बेळगावात मतदान केंद्रांमध्ये वेब कॅमेरे
गुढीपाडव्याच्या दिवशीही लसीकरण मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. शासकीय सुटी किंवा अन्य सुट्ट्यांनाही लसीकरण थांबविण्यात आलेले नाही. खासगी रूग्णालयात लस घेण्यासाठी २५० रुपये मोजावे लागतात. आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रात गेल्यास मोफत लस मिळते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रात जावून लस घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. लसीकरणाला प्रतिसाद मिळाल्याने लसीची तुटवडा होऊ नये यासाठी आरोग्य विभाग दक्ष झाला आहे.
“पहिल्या तीन टप्प्यांत लसीकरण मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. पण, आता मात्र प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्ह्यात रोज सुमारे पाच हजार जण कोरोना लस घेत आहेत.”
– डॉ. संजय डूमगोळ, आरोग्याधिकारी
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023