Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
नियंत्रण कक्षातून राहणार नजर; बेळगावात मतदान केंद्रांमध्ये वेब कॅमेरे
Aapli Baatmi April 14, 2021

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानकेंद्रांमध्ये व बाहेर वेब कॅमेरे बसविण्यात येत आहेत. बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात हे काम निवडणूक विभागाने हाती घेतले असून, त्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. बेळगाव शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी हे वेब कॅमेरे बसविण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला आहे.
बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी के. एच. जगदीश व बेळगाव दक्षिणचे सहायक निवडणूक अधिकारी चनबसाप्पा कोडली यांनी गेल्या आठवड्यात या केंद्रांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार बेळगाव उत्तरमध्ये २०, तर दक्षिण मतदारसंघात १२ अतिसंवेदनशील मतदानकेंद्र आहेत. याशिवाय बेळगाव उत्तरमध्ये १०५, तर दक्षिणमध्ये तब्बल २६८ संवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. या सर्वच ठिकाणी वेब कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय तेथे निमलष्करी दलाचे जवानही तैनात केले जाणार आहेत.
हेही वाचा – कोरोना रुग्ण नाहीत का? ‘रेमडेसिव्हिर’परत का पाठवली!
बेळगाव शहरात याआधी झालेल्या महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्यावेळी ज्या मतदानकेंद्रांवर गोंधळ किंवा दंगा झाला आहे. ज्या ठिकाणी बोगस मतदानाचा प्रकार झाला आहे, अशा मतदानकेंद्रांचा समावेश संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे अशा मतदानकेंद्रांवर नजर ठेवण्यासाठी वेब कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यामुळे निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून अशा मतदानकेंद्रांवर नजर ठेवता येणार आहे. यासह बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघात संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदानकेंद्र आहेत. त्या सर्वच ठिकाणी वेब कॅमेरे बसविले जाणार आहेत. १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: web camera set for election of belgaum the decision of election committee
<!–
–>
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023