Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड बस डेपोत जाऊन एस टी कर्मचाऱ्यांना दिला पाठिंबा
Aapli Baatmi November 09, 2021
मुरबाड प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. एस टी कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करून घेण्यासाठी हे सर्व कर्मचारी या आंदोलनात उतरले आहेत, या कर्मचाऱ्यांनी आपल्या संघटना, तसेच राजकीय संबंध बाजूला ठेऊन हा संप केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. एस टी कर्मचाऱ्यांना आपल्या तुटपुंज्या पगारात घर चालवणे कठीण झाले असून आपण आता हि आर पार ची लढाई लढत आहोत असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेणारे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री किसन कथोरे यांनी काल सोमवार दि ८ नोव्हेंबर रोजी मुरबाड बस स्टँड वर संपावर बसलेल्या या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला असून आपण या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना तसेच परिवहन विभागाला पत्र लिहिणार असल्याचे श्री कथोरे यांनी या वेळी सांगितले व सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले व कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये अशी विनंती.
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023