Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची २ वर्ष : आमदार किसन कथोरे
Aapli Baatmi November 22, 2021
आज सोमवार दि २२ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या २ वर्षीच्या फसवणूकी चा निषेध करण्या करिता पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या, याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील पत्रकार परिषदे साठी अलिबाग येथे मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा भारतीय जनता पार्टी, ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा श्री किसन कथोरे यांनी शासकीय विश्राम गृह येथे पत्रकारांना संबोधित केले, या प्रसंगी ठाकरे सरकारने गेल्या २ वर्षात महाराष्ट्रातील जनतेला कश्या प्रकारे वेठीस धरले आहे याची अनेक उदाहरणे देऊन सरकारच्या अपयशाची कुंडली मांडली. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शेती संबंधित अन्यायकारक धोरणामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान, केंद्र सरकार कडून निधी प्राप्त होऊन सुद्दा हा निधी राज्य सरकार शेतकऱ्यांना वाटप करत नसल्याचे श्री कथोरे यांनी सांगितले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा झालेले नाहीत, एस टी कर्मचाऱ्यांचे एवढे दिवस झाले तरी अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही हे दुर्दैवी आहे असे आमदार श्री किसन कथोरे यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी आमदार श्री रवी शेट पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते, रायगड जिल्हा सरचिटणीस श्री मिलिंद पाटील, रायगड जिल्हा सोशल मीडिया व आयटी संयोजक श्वेता ताड फळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री रवींद्र घोडविंदे, भाजपा ठाणे ग्रामीण सोशल मीडिया व आयटी संयोजक श्री मिलिंद धारवाडकर यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023