Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
काळजी घ्या! पावसाळ्यात आजार बळावले, राज्यातील 16 टक्के कुटुंबात संसर्गजन्य किंवा कोव्हिडसारखी लक्षणे
Aapli Baatmi August 09, 2023


Viral Infection and Covid19 Patients : राज्यात पावसाळी (Monsoon) आजारांनी मोठ्या प्रमाणात डोकं वर काढलं आहे. राज्यात ठिकठिकाणी सर्दी, खोकला, तापाची लक्षणं असलेले संसर्गजन्य आजारात वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात अशाप्रकारच्या आजारांनी डोकंवर काढल्याचे चित्र आहे. इन्फ्लुएंझा ए आणि इन्फ्ल्यूएंझा बी विषाणू व्यतिरिक्त राज्यात आता कोविडच्या नव्या सब-व्हेरीयंटचा देखील शिरकाव झाला आहे.
पावसाळ्यात आजारांचं प्रमाण वाढलं
राज्यातील 16 टक्के कुटुंबात संसर्गजन्य किंवा कोव्हिडसारखी लक्षणे आढळत आहेत. केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यातवायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एका राष्ट्रीय सर्व्हेक्षणात असं आढळलं आहे की, अनेक घरांमध्ये एकापेक्षा जास्त सर्दी, ताप आणि खोकल्याची रुग्ण आढळत आहेत. मात्र, लक्षणे रुग्णालयात भर्ती करण्याइतकी गंभीर नसल्याचं देखील आढळून आलं आहे.
सर्दी, खोकला आणि ताप वाढला!
इन्फ्ल्यूएन्झाच्या प्रकारातील एच1एन1 आणि एच3एन2 च्या रुग्णांची मोठी संख्या आढळत आहे. राज्यात 1 जानेवारी ते 7 ऑगस्टपर्यंत एकूण संशयित रुग्णांची संख्या 9 लाख 16 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. ऑसेलटॅमिवीर दिलेल्या संशयित फ्ल्यू रुग्णांची संख्या 6 हजार 520 वर गेली आहे. इन्फ्ल्यूएन्झा ए (एच1एन1 आणि एच3एन2) रुग्णांची संख्या 1 हजार 972 वर पोहोचली आहे.
एच1एन1 नंही चिंता वाढवली
एच1एन1 मुळे 1 जानेवारीपासून 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर, एच3एन2 मुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात रुग्णालयात उपचार घेतलेले रुग्ण 146 झाले आहेत. राज्यात कुटुंबातील एकाहून अधिक रुग्णांना सर्दी, ताप, खोकल्यासारखी लक्षणं असलेल्याची संख्या 16 टक्के आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये हाच टक्का 21 टक्के असून तर कर्नाटकात 33 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.
घाबरू नका, काळजी घ्या
कोविड 19 किंवा इन्फ्ल्यूएन्झाबाबत नियमित रुग्ण सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सोबतच, लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीनं उपचार करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना देखील करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविडचा प्रादुर्भाव अतिशय कमी झाला आहे. रुग्णसंख्या देखील कमी आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं कारण नसलं तरी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसचा नवीन एरिस व्हेरियंट पहिल्यांदा ब्रिटन (UK) मध्ये आढळून आला, त्यानंतर हा वेगाने पसरत आहे. आता ब्रिटननंतर मुंबईमध्येही कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट एरिसने सध्या ब्रिटनची चिंता वाढवली असून अनेक कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत. एरिस व्हेरियंट कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सबव्हेरियंट-EG.5.1 आहे, यालाच एरिस असंही म्हटलं जात आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023