Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Covid New Variant : चिंता वाढली! मुंबईत कोरोनाच्या नव्या एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका
Aapli Baatmi August 09, 2023


Eris Variant in India : जगभरात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी, कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटचा (New Corona Variant) भारतात पहिला रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. ब्रिटननंतर आता महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाच्या नवीन धोकादायक एरिस व्हेरियंटचा (ERIS Corona Variant) पहिला रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. ब्रिटनसह काही देशांमध्ये काही दिवसांपूर्वीच एरिस कोरोना व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता देशातही या व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे.
मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण
कोरोना व्हायरसचा नवीन एरिस व्हेरियंट पहिल्यांदा ब्रिटन (UK) मध्ये आढळून आला, त्यानंतर हा वेगाने पसरत आहे. आता ब्रिटननंतर मुंबईमध्येही कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट एरिसने सध्या ब्रिटनची चिंता वाढवली असून अनेक कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत. एरिस व्हेरियंट कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सबव्हेरियंट-EG.5.1 आहे, यालाच एरिस असंही म्हटलं जात आहे.
मे महिन्यातच आढळला होता रुग्ण
भारतात या एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण मे महिन्यातच सापडला होता. बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात महाराष्ट्रात नवीन सबवेरियंट आढळून आला होता, मात्र, त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात या व्हेरियंटचा कोणताही नवीन रुग्ण सापडलेला नाही.
एरिसची लक्षणे काय आहेत?
मीडिया रिपोर्टनुसार, एरिस कोरोना व्हेरियंटची मुख्य लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत. यामध्ये घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, कफ असलेला खोकला, स्नायू दुखणे आणि वास कमी होणे. दरम्यान, कोरोना रुग्णांमध्ये दम लागणे, वास कमी होणे आणि ताप ही आता मुख्य लक्षणे नाहीत. सध्याच्या खराब हवामानामुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते, असं मत वॉर्विक विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ प्रोफेसर लॉरेन्स यंग यांनी व्यक्त केलं आहे.
पुन्हा कोविड लाट येणार?
UKHSA च्या अहवालानुसार, सध्या ब्रिटनमध्ये कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण प्रति 100,000 लोकसंख्येमागे 1.97 टक्के इतकं आहे. देशातील प्रत्येक सात कोरोना संक्रमितांपैकी एका रुग्णाला नवीन एरिस व्हेरियंटची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, या नवीन व्हेरियंटमुळे ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा नवीन कोविड लाट येण्याची शक्यता आहे.
संबंधित इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023