Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Disease X मुळे मानवाचा अंत होणार? WHO चा इशारा; घातक रोगावर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचा प्रयत्न
Aapli Baatmi August 09, 2023


UK Vaccine Centre for Disease X : जागतिक आरोग्य संघटनेनुसार (World Health Organization) एक्स रोग (Disease X) हे भविष्यात जागतिक महामारीचे पुढील कारण असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार,अज्ञात रोग X मुळे होणाऱ्या नवीन साथीच्या रोगाविरूद्ध संरक्षणासाठी लस विकसित केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटने (WHO) नं म्हटलं आहे, पुढील दहा वर्षात कोरोनापेक्षाही भीषण महामारी येण्याची शक्यता असून यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी या अज्ञात रोगाविरूद्ध लस विकसित करण्यास सुरुवात केली आहे. एक्स रोग म्हणजे काय जाणून घ्या.
भविष्यात कोरोनाहून घातक महामारीचा धोका
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी उघड केलं आहे की, 100 दिवसांच्या आत प्राणघातक महामारी थांबविण्यासाठी लस तयार करण्याच्या कामात ब्रिटीश शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. भविष्यात कोरोनाहून घातक महामारीविरोधात लढण्यासाठीची ही पाऊलं आहेत. विल्टशायरमधील सरकारच्या उच्च सुरक्षा पोर्टन डाउन लॅब कॉम्प्लेक्समध्ये ही लस तयार करण्याचं काम सुरु आहे. 200 हून अधिक शास्त्रज्ञांची टीम यासाठी काम करत आहे.
एक्स रोग म्हणजे काय?
2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) “डिसीज एक्स” नावाच्या अज्ञात आजारामुळे मानवजातीचा संपूर्ण नाश होण्याचा अंदाज वर्तवला होता. डिसीज एक्स अर्थात रोग एक्स म्हणजे आणि हे नाव कसं पडलं हे जाणून घ्या. डब्ल्यूएचओच्या शास्त्रज्ञांनुसार एक्स रोगामुळे भविष्यात जागतिक महामारी होऊ शकते. हा अज्ञात रोग डब्ल्यूएचओच्या रोगांच्या ब्लूप्रिंट यादीचा एक भाग आहे. एक्स रोग हा नेमका कोणत्या विषाणूमुळे पसरले हे अद्याप स्पष्ट नाही.
रोगाचा शोध, उपचार आणि प्रतिबंध
एक्स रोगाचा शोध, उपचार आणि प्रतिबंध यासाठी जलद संशोधन आणि विकास आवश्यक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे की, ‘एक्स रोग भविष्यात उद्रेक होणार गंभीर महामारी आहे. हा साथीचा रोग एखाद्या विषाणूमुळे होऊ शकतो, जो सध्या मानवी रोगास कारणीभूत नाही.’
थोडक्यात सांगायचं झालं तर, भविष्यात कोरोनापेक्षाही अधिक घातक महामारी उद्भवण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे कोरोना महामारी पसरली आणि संपूर्ण जगावर याचा परिणाम झाला. अनेकांचा मृत्यू झाला. तसं भविष्यात होऊन नये म्हणून शास्त्रज्ञ आतापासूनच या रोगाचा शोध घेत असून लस तयार करत आहेत.
एक्स रोगावर लस कशी तयार करणार?
रोग माहित नाही मग, लस कशी तयार करणार, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. प्रत्येक विषाणू वातावरण आणि काळाप्रमाणे स्वत:मध्ये बदल करत असतो आणि अधिक ताकदवर होतो. आता बर्ड फ्लूचं उदाहरण घ्या. या रोगाची लागण आधी फक्त कोंबड्यांना झाली, त्यानंतर हा रोग इतर प्राण्यामध्ये आणि आता माणसांमध्येही परसला आहे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेले काही जीवाणू किंवा विषाणू भविष्यातील घातक महामारीसाठी कारणीभूत ठरू शकतात. याच दृष्टीने शास्त्रज्ञ आतापासून कामाला लागले आहेत.
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023