Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
CM eknath shinde : एकनाथ शिंदे नाराज आहेत का? चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं...
Aapli Baatmi August 12, 2023

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील (Chandani Chawk Flyover) पुलाचं आज लोकार्पण होणार आहे. याच लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीबाबत शाशंकता व्यक्त केली जात होती. अखेर मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नाही आहे. त्यामुळे आम्हीच त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. आराम करण्यासाठी ते त्यांच्या मुळगावी गेले असल्याने ते आजच्या चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. एकनाथ शिंदे हे नाराज नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा कोणीही करु नये.
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023