Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
पुणे लोकसभा मतदारसंघात "फ्रेंड्स ऑफ बी जे पी" बैठक संपन्न
Aapli Baatmi August 27, 2023
प्रतिनिधी: पुणे
शनिवार दि २६ जुलै २०२३ रोजी पुण्यातील कल्याणीनगर येथील हॉटेल रॉयल ऑर्किड येथे आज “फ्रेंड्स ऑफ बीजेपी” चा प्रथम जनसंपर्क कार्यक्रम पार पडला. फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे प्रदेश संयोजक श्री.सतीश निकम हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासोबत प्रदेश सहसंयोजक डॉ. आशिष पावसकर आणि प्रदेश माध्यम संयोजक श्री. विनीत मोरे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती उषा बाजपेयी (प्रदेश सह संयोजिका) यांच्यासोबत फ्रेंड्स ऑफ बीजेपी चे श्री. जितेंद्र सिंग (लोकसभा संयोजक) आणि श्री.विक्रांत आर्य (लोकसभा सह-संयोजक) यांनी केले.भाजपा पुणे जिल्हा माजी अध्यक्ष श्री. जगदीश मुळीक हे या कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते.
समाजकल्याण संस्था, एनजीओ, बांधकाम व्यावसायिक, फायनान्स, निवृत्त सैन्य अधिकारी आणि वकील अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर लोकं या कार्यक्रमासाठी उपस्थित होती.
सभागृहात अनेक विषयांवर चर्चा झाली, आज विश्वभरात भारत आणि भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोण फार बदललेला आहे. हे सर्व आपल्या सक्षम केंद्रीय नेतृत्वाच्या परिश्रम मुळे झाले आहे. याआधी घोटाळे आणि भ्रष्टाचाराने त्रस्त नागरिक पार कंटाळले होते. मोदी सरकारच्या योजनांचा लाभ सर्व सामाजिक स्तरांतील नागरिकांना झाला. त्यांचा फायदा गरीबांबरोबरच श्रीमंतांनाही झाला आहे. या कार्यक्रमात उपस्थित सर्व लोकांमध्ये याची चांगलीच चर्चा झाली. या योजनांची जनजागृती पुण्यातील लोकांपर्यंत अधिक कशी पोहोचू शकते यावर पुढे चर्चा करण्यात आली.
- नंतर श्री. सतीश निकम व त्यांच्या टीमने श्री. धीरज घाटे, पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष, यांची भेट घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्व 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये फ्रेंड्स ऑफ बीजेपी चे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली.
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023