Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Covid-19 Treatment Effect: कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळाच्या डोळ्यांचा रंगच बदलला; धक्कादायक घटना आली समोर, डॉक्टरांनी सांगितलं 'हे' कारण
Aapli Baatmi September 08, 2023


Covid-19 Treatment Effect: कोरोना (Coronavirus Effects) महामारीनं जवळपास सर्व जग आपल्या विळख्यात घेतलं होतं. कोरोनावर मात करत अनेकजण कोरोनामुक्त झाले, तर अनेकांनी आपले प्राणही गमावले. अशातच थायलंडमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका लहान बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाली आणि त्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. पण उपचारादरम्यान, त्या बाळाच्या डोळ्यांचा रंगच बदलल्याचं लक्षात आलं. याला तज्ज्ञांनी मेडिकल साईड इफेक्ट्स असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ही घटना थायलंडमधील आहे. एका सहा महिन्यांच्या बाळाला एक दिवस ताप आणि खोकला होता. त्यानंतर त्याच्या काही तपसण्या करण्यात आल्या, तर बाळाला कोरोनाची लागण झाली असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांनी तात्काळ बाळावर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी बाळाला तीन दिवसांसाठी फेविपिराविर औषध दिलं, त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं लक्षात आलं, तसेच कोरोनाची लक्षणंही कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
बाळावर औषधोपचार केल्यानंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झालीच, पण त्यानंतर 18 तासांतच बाळाच्या आईच्या लक्षात आलं की, त्याच्या डोळ्यांचा रंग बदलला आहे. बाळाच्या डोळ्यांचा रंग राखाडी होता आणि उपचारानंतर बाळाचे डोळे निळे दिसू लागले होते. हे आईनं तात्काळ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिलं. डॉक्टरांनी तात्काळ बाळावरील उपचार थांबवले आणि त्याला दिलं जाणारं औषध फेविपिराविर पाच दिवसांसाठी थांबवण्यात आलं. त्यानंतर मात्र बाळाच्या डोळ्यांचा मूळ रंग पुन्हा दिसू लागला.
बालरोगतज्ज्ञांनी फेविपिराविरमुळे डोळ्यांच्या रंगात झालेल्या बदलामुळे थेरपी बंद करण्याचा सल्ला दिला. बाळावरील उपचार आणि फेविपिराविर देणं बंद केल्यानंतर तात्काळ बाळाच्या डोळ्यांचा मूळ रंग परत दिसू लागला. 2021 मध्ये भारतातही अशीच एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये फेविपिराविर दिल्यामुळे एका 20 वर्षीय व्यक्तीचे घारे डोळे चमकदार निळ्या रंगात बदलले होते. 2022 मध्ये थायलंड सरकारनं कोरोनावरील उपचारांसाठी फेविपिराविर औषधांच्या वापराला परवानगी दिली होती. हे औषध लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वापरलं जातं.
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023