Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...
मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...
September 26, 2023
Hardeep Singh Nijjar: कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश
Aapli Baatmi September 19, 2023

India-Canada Relations: कॅनडानं (Canada) भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची (Hardeep Singh Nijjar) हत्या केल्याचा आरोप केला आणि एका उच्च भारतीय राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले. कॅनडाचं कृत्य गांभीर्यानं घेत भारतानंही जशास तसं उत्तर दिलं आहे. कॅनडाच्या राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत कॅनडाच्या राजदुताला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं वक्तव्य केलं आणि संपूर्ण देशभरात खळबळ माजली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी थेट भारतावर आरोप केले. एवढंच नाही तर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही तशीच वक्तव्य केली. यानंतर भारतानं एक निवेदन जारी करून कॅनडाकडून आरोप फेटाळून लावले. कॅनडानं केलेला हत्येचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं भारतानं म्हटलं आहे.
कॅनडाच्या राजदुतांच्या हकालपट्टीवर परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?
कॅनडाच्या वतीनं करण्यात आलेल्या आरोपांनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं एक निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. परराष्ट्रानं म्हटलं आहे की, कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना आज पाचारण करण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की, भारतानं नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ कॅनेडियन राजदुताला देश सोडण्यास सांगण्याचा निर्णय घेतला आहे. राजदुताला पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलं आहे की, “हा निर्णय कॅनडाच्या राजदुताचा आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग यावर भारत सरकारची वाढती चिंता प्रतिबिंबित करतो.
हरदीप सिंह निज्जर आहेत तरी कोण?
हरदीप सिंह निज्जर हे बंदी घातलेल्या फुटीरतावादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित होते. गुरुपतवंत सिंह पन्नू यांच्यानंतर ते या गटाचे दुसरे नेते होते. या वर्षी 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर हा जालंधरच्या भारसिंह पुरा गावचे रहिवाशी होते. 1996 मध्ये ते कॅनडाला गेले, त्यानंतर त्यांनी कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम सुरू केलं. मात्र कालांतरानं ते खलिस्तानी कारवायांमध्ये सामील झाले.
निज्जर हे कॅनडाचे नागरिक झाले होते. त्यामुळेच त्यांच्या हत्येनंतर कॅनडातील काही शीख फुटीरतावादी संघटनांनी या हत्येचा तपास करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी निज्जर यांच्या हत्येबाबत संसदेत माहिती दिली. ते म्हणाले की, कॅनडाच्या नागरिकांची त्याच्या भूमीवर हत्या करणं हे सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत कॅनडा हे खलिस्तानी कारवायांचं केंद्र बनलं आहे. अनेक खलिस्तानी दहशतवादी येथे लपले आहेत.
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023