Pneumonia Outbreak : चीनमध्ये नवा आजार, आता राज्य सरकार अ...
Pneumonia Outbreak in China : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास...
November 29, 2023
Web Series : चाकरमान्यांच्या कोकणवारीवर कसला कॉपीराइट? 'देवाक काळजी' वेब सीरिजला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
Aapli Baatmi September 21, 2023

मुंबई : गणेश उत्सवाला (Ganeshotsav) आपल्या मूळ गावी जाणं ही महाराष्ट्राची पारंपारिक प्रथाच आहे. त्यावर कोणाचाही कॉपीराईट असू शकत नाही, असं मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) ‘देवाक काळजी’ या वेब सीरिजच्या (Web Series) प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या वेब सिरीजची स्क्रीप्ट आपली आहे, असा दावा करत नवीगनस् स्टुडिओ प्रा. लि. यांनी कॉपीराइटच्या मुद्यावर हायकोर्टात धाव घेतली आहे. कंपनीने जो कॉपीराईटचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि वेब सीरिजमध्ये जे दाखवण्यात आलेलं आहे, ती महाराष्ट्रातील प्रथाच आहे. गणपतीला लोक आपल्या गावी जातच असतात. त्यावर कोणाचाच कॉपीराईट असू शकत नाही, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.
या कॉपीराईटची शाहनिशा करण्यासाठी न्यायमूर्ती मनिष पितळे यांनी वेब सीरिजचे चार भागही बघितले. त्यानंतर वेब सीरिजची कथा ही चित्रपटातून घेतलेली आहे, असं प्रथमदर्शनी तरी स्पष्ट होत नाही. वेब सीरिजच्या कथेची कागदपत्रेही योग्य आहेत, असं नमूद करत हायकोर्टानं वेब सीरिजच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यास नकार देत याचिकेवरील पुढील सुनावणी 25 ऑक्टोबर पर्यंत तहकूब केली आहे. 15 सप्टेंबरला यु-ट्यूबवर ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे.
काय आहे प्रकरण :
‘घरचा गणपती’ या चित्रपटाच्या कॉपीराईटचा मुद्दा कंपनीनं उपस्थित केला होता. ‘देवाक काळजी’ या वेब सीरिजचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते समीर खांडेकर आणि अभिनेत्री दिब्यलक्ष्मी यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केला आहे, असा आरोप कंपनीनं केला होता. आमच्या चित्रपटाची थीम या वेब सिरीजमध्ये कॉपी करण्यात आली आहे, असा दावा कंपनीच्यावतीनं हायकोर्टात केला गेला.
आमचा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र आमच्या चित्रपटातील काही दृश्य वेब सीरिजमध्ये जशीच्या तशी घेण्यात आली आहेत. तसेच अभिनेत्री दिब्यलक्ष्मी आमच्या चित्रपटातदेखील आहे. चित्रपटाप्रमाणेच तिची वेब सीरिजमध्येही तिची तिच भूमिका आहे, त्यामुळे हा विश्वासघात आहे. इथं सरळसरळ कॉपीराईटचा भंग झाल्याचा आरोप कंपनीकडून करण्यात आला.
मात्र या याचिकेला ‘देवाक काळजी’ या वेब सीरिजकडून विरोध करण्यात आला. या वेब सीरिजच्या कथेवर साल 2021 पासून काम सुरु होतं जे जुलै 2022 मध्ये पूर्ण झालं. गणेश उत्सवात कुटुंब कसं एकत्र येतं या थीमवर कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही, असा दावा वेब सीरिजच्या निर्मात्यांकडून केला गेला.
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023