Pneumonia Outbreak : चीनमध्ये नवा आजार, आता राज्य सरकार अ...
Pneumonia Outbreak in China : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास...
November 29, 2023
World News: 17 बायका, 96 मुलं, तरीही भरलं नाही 'या' व्यक्तीचं मन; आता करु इच्छितो अनोखा विक्रम
Aapli Baatmi September 21, 2023

UAE: ‘लहान कुटुंब, सुखी कुटुंब’ हा नारा भारतात (India) मोठ्या प्रमाणात दिला जातो. पण अन्य देशातील लोकांना याची इतकी पर्वा नसते आणि असाच एक माणूस दुबईत (Dubai) राहतो. या माणसाने एक-दोन नव्हे, तर तब्बल 17 महिलांशी लग्न केलं आहे, या महिलांपासून तो 96 मुलांचा बाप बनला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, आता या माणसाने असं काही करायचं ठरवलं आहे, ज्यामुळे विश्वविक्रमही (World Record) होऊ शकतो. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया.
या व्यक्तीला 100 मुलांचा बाप बनण्याची इच्छा
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दुबई शहरात मोहम्मद अल बलुशी हा व्यक्ती वास्तव्यास आहे. लोक त्यांना सुपर डॅड म्हणूनही ओळखतात. आतापर्यंत 96 मुलांचा बाप बनलेल्या अल बलुशीला आता 18व्यांदा लग्न करायचं आहे आणि त्यानंतर आणखी चार मुलं जन्माला घालून त्याला 100 मुलांचा बाप होण्याचा विक्रम (Record) करायचा आहे. थोडं विनोदी भाषेत बोलायचं झालं तर, त्यांना मुलं जन्माला घालण्यात शतक (Century) झळकवायचं आहे. सध्या या व्यक्तीचं वय 77 वर्षं आहे.
कुटुंबात एकूण किती लोक राहतात?
या आधी सांगितल्याप्रमाणे, मोहम्मद अल बलुशीने 17 लग्न केले आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की, त्याचं कुटुंब खूप मोठं आहे. त्याच्या कुटुंबात 96 मुलं आणि 17 पत्नी असे एकूण 170 लोक राहतात. तो केवळ मुलांचा पिताच नाही, तर त्याच्या नातवंडांचा आजोबा देखील आहे. हे संपूर्ण कुटुंब दुबईमध्ये 17 वेगवेगळ्या घरांमध्ये राहते. या सुपर डॅडचा मोठा मुलगा 56 वर्षांचा आहे, तर सर्वात लहान मुलगी ही फक्त 8 वर्षांची आहे.
10 वर्षांपूर्वी केला होता रेकॉर्ड बनवण्याचा संकल्प
खरं पाहता, 2013 मध्ये मोहम्मद अल बलुशी यांनी ठरवलं होतं की, त्यांना 100 मुलं जन्माला घालायची आहेत. ते म्हणाले होते की, एकदा 100 चा आकडा गाठला की पुढे एकही मूल जन्माला घालणार नाही. सध्या त्यांना 100 मुलं जन्माला घालण्याचा विक्रम करायचा असेल तर त्यांना अजून 4 मुलांना जन्म द्यावा लागेल. यामुळे ते आता विक्रमापासून 4 पावलं दूर आहेत. या माणसाच्या दोन मुलांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तर दुसरं लग्न करुन त्यांना आता चार मुलं हवी आहेत.
सुपर डॅडच्या वडिलांनाही होती 27 मुलं
मोहम्मद अल बलुशी यांना त्यांच्या वडिलांकडून मुलं जन्माला घालण्याची आवड वारसाहक्काने मिळाली आहे. त्यांच्या वडिलांनी चार लग्न केली होती, या विवाहांतून त्यांना एकूण 27 मुलं झाली. वयाच्या 110 व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा:
टीव्ही पाहून आणि 3 तास झोपून लाखो रुपये कमावते ही महिला; म्हणते, ‘ही’ जगातील सर्वोत्तम नोकरी
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023