Pneumonia Outbreak : चीनमध्ये नवा आजार, आता राज्य सरकार अ...
Pneumonia Outbreak in China : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास...
November 29, 2023
टीव्ही पाहून आणि 3 तास झोपून लाखो रुपये कमावते ही महिला; म्हणते, 'ही' जगातील सर्वोत्तम नोकरी
Aapli Baatmi September 21, 2023

Trending News: जर एखाद्याला श्रीमंत (Rich) व्हायचं असेल तर त्याला कठोर परिश्रम (Efforts) करावे लागतात आणि म्हणूनच लोक म्हणतात की पैसा (Money) हा कष्टाने कमवावा लागतो. पण एक महिला अशीही आहे जी फक्त झोपून, टीव्ही बघून आणि लहान मुलांसोबत खेळून मोठी कमाई करते. आता तुम्ही विचार करत असाल की असं करून ती कसे बरं पैसे कमवत असेल? तर ही महिला ‘केअर टेकर’ म्हणून काम (Job) करते, ज्यात तिला श्रीमंत कुटुंबातील लहान मुलांची काळजी घ्यायची असते, याच गोष्टीसाठी तिला पगार (Salary) दिला जातो.
नोकरीबद्दलचा आनंद शब्दांत केला व्यक्त
कॅली नावाच्या या महिलेने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत ही महिला तिला या नोकरीतून खूप समाधान मिळत असल्याचं सांगते. ती म्हणते, मी करत असलेली नोकरी ही जगातील सर्वोत्तम नोकऱ्यांपैकी एक आहे. ती सांगते की, दुपारी तिला मुलांसोबत बसून टीव्ही पाहावा लागतो. इतकंच नाही तर त्यांना सांभाळताना तिला मध्ये दुपारी तीन तास झोपही मिळते, त्यामुळे एकूणच हे काम सर्वोत्कृष्ट म्हणता येईल.
कसा असतो कॅलीचा एकूणच दिवस?
आपल्या दैनंदिन कामांची माहिती देताना कॅली म्हणते, श्रीमंत लोकांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे. लोकांना तिच्या दैनंदिन जीवनाची अपडेट देताना कॅली म्हणते की तिचं काम सर्वात सोपं आहे.
स्टारबक्समध्ये बसून पिते कॉफी
सर्वप्रथम ती मुलांसोबत बसून टीव्ही पाहते, त्यानंतर ती मुलांना सोडण्यासाठी शाळेत जाते. त्यानंतर सर्वात छोटा मुलगा हॅम्प्टन याच्यासोबत बसून ती स्टारबक्समध्ये कॉफी पिते. ती छोट्या हॅम्प्टनला स्टारबक्समधून केक देखील घेऊन देते.
शाळेतून परतल्यावर दोघेही कॅलीच्या जिममध्ये जातात, तिथे कॅली जिम करते आणि हॅम्प्टन खेळतो. जिम केल्यानंतर कॅली अंघोळ करून तयार होते. हे सर्व करून नंतर काही लोकांना भेटून दोघेही घरी परततात. शाळेतून आल्यावर कॅली हॅम्पटनसोबत जेवते आणि नंतर थोडा वेळ ते दोघं खेळतात.
दुपारी तीन तास मिळते झोप
यानंतर कॅलीला जे काम करण्यात सर्वात जास्त आनंद मिळतो, ते काम ती करते आणि ते म्हणजे, कॅली आणि हॅम्प्टन घरी आल्यावर जेऊन तीन तास झोपतात. या वेळेत घरगुती कामं करणारे दुसरे गडी संपूर्ण घर स्वच्छ करतात आणि कपडे धुतात. अशा प्रकारे कॅलीचं काम संध्याकाळपर्यंत संपतं.
कॅलीला किती पगार मिळतो?
कॅलीने तिला या कामासाठी किती पैसे मिळतात हे सांगितलेलं नाही. पण अमेरिकेत श्रीमंत कुटुंबात केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलांचा सरासरी पगार 30 लाख रुपये आहे. यावरून कॅलीला मिळणाऱ्या पगाराचा अंदाज तुम्ही लाऊ शकता.
हेही वाचा:
Rajasthan: चमत्कार म्हणावा की आणखी काय? राजस्थानमध्ये जन्मलेल्या बाळाला तब्बल 26 बोटं; कुटुंबीय चकित
Source From : abplive marathi
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023